घनबावरे बरसले ग्रीष्मातल्या दुपारी
जणू गायली नभाने अशब्द रागदारी
आभाळ कापराचे मग कृष्णरंग होते
अंगांग अन धरेचे मुरली तरंग न्हाते
सरी शुभ्र ओघवेड्या घेउन वल्लरीना
जणू तानपुरा छेडे अलवार मध्यमांना
चमकून मग जराशी सौदामिनी कडाडे
ठुमरी श्रवूनिया ती मन होई सूर वेडे
ती रेशमी झुळूक मृदगंध ल्यायलेली
प्राशून मेघ सूर मल्हार गायलेली
भिजवूनी नखशिखांत तो कृष्णमेघ हसतो
पानावर सरींचा झूमरा लयीत घुमतो
बरसले हे तराणे ग्रीष्मातल्या दुपारी
ठेवून मेघ गेले कविता नवीन अधरी
अनुजा
अनुजा
No comments:
Post a Comment